बदलापुरकरांना घडणार धर्मवीरांचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरकरांना घडणार धर्मवीरांचे दर्शन
बदलापुरकरांना घडणार धर्मवीरांचे दर्शन

बदलापुरकरांना घडणार धर्मवीरांचे दर्शन

sakal_logo
By

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा मोफत आनंद लुटण्याची संधी बदलापूरवासीयांना मिळणार आहे. शिवसेना शहर शाखा आणि वरुण इन्फ्रातर्फे बदलापूर पश्चिम येथील वैशाली चित्रपटगृहात सात दिवस या मोफत शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटाचा आस्वाद बदलापूरकरांना मिळावा यासाठी चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ ते ९ या वेळात बदलापूर पश्चिम येथील वैशाली चित्रपटगृहात ७६६ जणांना हा शो मोफत दाखवण्यात येणार आहे. तसेच १३ मे पासून ते १८ तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी ६ ते ९ वाजता सलग सात दिवस संपूर्णपणे मोफत हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. वरुण इन्फ्राचे वरुण म्हात्रे यांच्या सहकार्याने हा मोफत दाखवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना हा शो पाहावयाचा आहे त्यांनी जवळील शिवसेना नगरसेवक अथवा शिवसेनेच्या शहर शाखेत संपर्क साधून आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन वामन म्हात्रे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82103 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top