पुनर्विकास थांबवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकास थांबवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा
पुनर्विकास थांबवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा

पुनर्विकास थांबवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाचे काम अखेर मार्गी लागले आहे; परंतु तरीसुद्धा येथील एकमेकांमध्ये असणारे हेवेदावे पुनर्विकासाच्या आड येत आहेत. काही दिवसांपूर्वीच येथील रहिवासी नरेंद्र राठोड यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणी येथील माजी स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांना गुंतविण्याचा काही लोकांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहेत. मात्र राठोड यांच्या पत्नी यांनीच समाजमाध्यमांसमोर येऊन राठोड यांनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केल्याची बाब स्पष्ट केल्यामुळे पाटकर यांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

वाशी, सेक्टर ९ येथील कैलास शिखर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. येथील ६४८ सदनिकाधारकांपैकी ६४७ सदनिकाधारकांनी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तसेच अनेकांनी रीतसर संमती देऊन घरे रिकामी केली आहेत. काही जण अद्यापही घरे रिकामी करण्यास तयार होत नाही. अशांना घर रिकामे करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. यादरम्यान नरेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेत स्थानिक माजी नगरसेवक किशोर पाटकर आणि खासगी विकसकाला अडकवण्यासाठी या आत्महत्या प्रकरणाचा उपयोग प्रकल्पाला विरोध करणारे लोक करीत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला, तर नरेंद्र राठोड यांच्या पत्नी अरुणा यांनी आपल्यावर पाटकर यांचे नाव घेण्यासाठी लीला सोलंकी यांनी दबाव टाकल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे; परंतु आपण राठोड यांच्या पत्नीला एकदाही भेटले नसल्याचे लीला सोलंकी यांनी सांगितले.

‘गुन्हा दाखल करणार’
आपण व्यवसायाने वकील असल्याने घडलेल्या घटनेसंबंधी माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता, पीडित महिलेचे संभाषण ऐकले. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सोलंकी यांनी स्पष्ट केले. मात्र आपला आणि विकसकाचा संबंध नसतानाही या आत्महत्येप्रकरणी गोवण्यासाठी महिलेवर दबाव टाकणाऱ्यांविरोधात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे किशोर पाटकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82112 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top