कोपरीत भटक्या कुत्र्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरीत भटक्या कुत्र्याची दहशत
कोपरीत भटक्या कुत्र्याची दहशत

कोपरीत भटक्या कुत्र्याची दहशत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : मागील काही महिन्यांपासून ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला झाल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशातच ठाण्याच्या पूर्व भागातील अष्टविनायक चौक परिसरात एका कुत्र्याने १३ जणांचे लचके तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कोपरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. संध्याकाळच्या वेळी या परिसरात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून याच परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्र्यांनी सोमवारी एकाच दिवशी अष्टविनायक चौक परिसरात राहणाऱ्या १३ जणांचे लचके तोडल्याची बाब समोर आली आहे. चावा घेणाऱ्या लोकांमध्ये तीन ते चार महिलांसह एका वृद्ध महिलेला चावा घेतला असल्याचे समजते. कोपरीकडे पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे लक्ष्य नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. या संदर्भात ठाणे महापलिकेच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, या भागात एक कुत्रा दगावला आहे. त्याला रेबीज आजार झाल्याचे समोर आले आहे. हा कुत्रा कसा दगावला हे मात्र समजू शकले नाही.
.....................
चौकट :-
ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. सोमवारी कोपरी भागात भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटना घडल्या तरी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्याची माहितीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी कसा लागणार, असा सवाल ठाणेकर नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
---
कोट :-
श्वानाचा मृत्यू कसा झाला हे समजू शकले नाही. एका प्राणिप्रेमी संघटनेने श्वानाचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. तसेच ज्या नागरिकांना श्वानाने चावा घेतला आहे, त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावे.
- डॉ. भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82113 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top