कामोठेत चोरीच्या दोन घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठेत चोरीच्या दोन घटना
कामोठेत चोरीच्या दोन घटना

कामोठेत चोरीच्या दोन घटना

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : कामोठेमध्ये बतावणी, फसवणूक व सोनसाखळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने नागरिक असुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. कामोठे वसाहतीत महिला रस्त्याने जात असताना त्यांच्या हातामधील बॅग चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली; तर दुसऱ्याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चेन व लॉकेट चोरून नेले.

कामोठे वसाहतीत सेक्टर २२ येथील नीलकंठ ग्रीन येथे राहणारी ३३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहत आहे. त्या रात्री पार्लर बंद करून आपल्या घराकडे पायी निघाल्या होत्या. त्यांनी खांद्यावर ठेवलेली पर्स बॅग सेक्टर २२ येथील शिवनेरी सोसायटीजवळ आले असता पाठीमागून आलेल्या दोघेजण दुचाकीस्वार व्यक्तींनी त्या महिलेच्या हातातील बॅग हिसकावली आणि नौपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पसार झाले. यावेळी त्या बॅगमध्ये मोबाईल फोन, सोन्याची साखळी, अंगठी व इतर दागिने असे एकूण ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सेक्टर १८ येथे राहणारी ५४ वर्षीय महिला सकाळी भूमीरत्न सोसायटी या इमारतीबाहेरील रस्त्यावरून चालत जात होती. पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यात असलेली ८७,५०० रुपये किमतीची सोन्याची चेन व त्याला असलेले लॉकेट घेचून घेऊन मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे पसार झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82120 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top