रबाळे तलावात महिलेचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रबाळे तलावात महिलेचा बुडून मृत्यू
रबाळे तलावात महिलेचा बुडून मृत्यू

रबाळे तलावात महिलेचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गालगत असलेल्या रबाळे तलावात एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) दुपारी घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ती रबाळे तलावात आंघोळ करण्यासाठी आली होती. आंघोळ करत असतानाच ती या तलावात बुडाली. तलावाच्या बाजुने जाणाऱ्या काही नागरिकांना महिला तलावात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
मात्र, तोपर्यंत महिला बुडाली होती. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेला बाहेर काढून तिचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82124 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top