आरटीई प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद
आरटीई प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद

आरटीई प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद

sakal_logo
By

आरटीई प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद
केवळ ६ हजार ६७३ प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. यंदाच्या वर्षी आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. निवड झालेल्या बालकांपैकी केवळ ६ हजार ६७३ बालकांचे या योजनेंतर्गत प्रवेश निश्चित झाले आहेत; तर ३ हजार ७५६ बालकांनी निवड होऊनही प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित, दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पंचायत समिती आणि महापालिका क्षेत्रामधील एकूण ६४८ शाळा पात्र असून १२ हजार २६७ जागा उपलब्ध होत्या. यंदा या आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला होता. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातून २५ हजार ७०२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १० हजार ४२९ बालकांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु निवड झालेल्या बालकांपैकी केवळ ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती समोर आली आहे; तर कागदपत्रांमधील काही त्रुटींमुळे ३३ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तसेच ३ हजार ७५६ बालकांची निवड होऊनही त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षी दुप्पटीने अर्ज प्राप्त होऊनही आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या बालकांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82127 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top