कल्याणमध्ये तब्बल ५ कोटींची वीजचोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये तब्बल ५ कोटींची वीजचोरी
कल्याणमध्ये तब्बल ५ कोटींची वीजचोरी

कल्याणमध्ये तब्बल ५ कोटींची वीजचोरी

sakal_logo
By

कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण तालुक्यातील तब्बल पाच कोटी ९३ लाखांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशर या खडी केंद्रासाठी ही वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघड केले आहे. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्किट मीटरमध्ये बसवून गेल्या २९ महिन्यांपासून क्रशरचालकाने ३४ लाख ९ हजार ९०१ युनिट विजेची चोरी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात क्रशर मालक व चालक असलेल्या पिता-पुत्राविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत गजानन भांबरे आणि सचिन चंद्रकांत भांबरे अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. भरारी पथकाने फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशरच्या (सर्व्हे क्रमांक १४९/१४) मीटरची ५ मे रोजी तपासणी केली. यात मीटरमध्ये छेडछाड केल्याचे व वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यामुळे मीटर ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत सखोल तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये काळ्या रंगाची चिकटपट्टी गुंडाळून रिमोट कंट्रोल सर्किट बसवण्यात आल्याचे आढळले. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने हे सर्किट नियंत्रित करून क्रशरच्या प्रत्यक्ष वीज वापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल, अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक शिवाजी इंदलकर, उपसंचालक सुनिल थापेकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते, शशांक पानतावणे, सुनील राठोड, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी धनंजय कुटे, सहायक अभियंता अतुल ओव्हळ, हेमंत तिडके, तंत्रज्ञ अरुणा नागरे, प्रफुल्ल राऊत, प्रदीप फरद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82128 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top