उपायुक्त डॉ. राहूल गेठेंना भाजपचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपायुक्त डॉ. राहूल गेठेंना भाजपचा विरोध
उपायुक्त डॉ. राहूल गेठेंना भाजपचा विरोध

उपायुक्त डॉ. राहूल गेठेंना भाजपचा विरोध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नगरविकास खात्याने नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्त केलेले डॉ. राहुल गेठे यांच्या नियुक्तीला भाजपने विरोध केला आहे. सरकारी अथवा निमसरकारी सेवेतील राजपत्रीत अधिकारी नसतानाही गेठेंची केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा भाजपने केला आहे. सरकारी प्रशासकीय सेवेचा अनुभव नसताना केवळ एका मंत्र्याचे खाजगी स्विय सहायक असल्यामुळे प्रशासनाने दबावाखाली गेठेंची नियुक्ती केल्याची तक्रार भाजपचे युवा नेते राहुल शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

राहुल गेठे यांच्या नियुक्तीबाबत याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने गेठेंची बदली केली. आता पुन्हा गेठे यांची महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती केल्यामुळे महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांसहीत राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याआधी गेठे हे महापालिकेच्या सेवेत कोविड १९ चे समन्वयाचे काम करत होते. त्यावेळी मेट्रोपोलीस लॅबमध्ये एक हजार रुपयांत कोविड चाचणी करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर सादर केला होता. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील कृष्णा लॅबला १८०० रुपयांत चाचणी करण्यास मुभा देऊन फायदा मिळवून देण्यात आल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले. गेठे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
----------------------------------------------
या कारणांमुळे नियुक्ती बेकायदेशीर
महापालिकेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी डॉ. राहुल गेठे यांनी सेवा पुस्तिका, अंतिम वेतन प्रमाणपत्र, कार्यमुक्ती अहवाल जोडणे अपेक्षित असल्याचा दावा भाजपने केला आहे. पण गेठे यांनी ही कागदपत्रे महापालिकेच्या प्रशासन विभागाकडे जमा केलेली नाहीत, असे राहुल शिंदे यांचे म्हणणे आहे. गेठे यांच्या नियुक्ती पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे स्वियेत्तर नियोक्त्याला सेवेची आवश्यकता नसल्यास त्यांच्या सेवा परत करण्याची मुभा स्वियेत्तर नियोक्त्याला आहे. गेठे हे उप जिल्हाधिकारी, उप सचिव, मुख्याधिकारी या संवर्गातील अधिकारी नसल्याने त्यांची उपआयुक्त पदावरील नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा तक्रारदार राहुल शिंदे यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82132 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top