बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन
बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन

बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) ः बिल काढण्याच्या मोबदल्यात लेखा विभाग १० टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप नुकताच एका ठेकेदाराने केला. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने नुकतीच बदली झालेले मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या १ जानेवारी २०२० ते ५ मे २०२२ या कालावधीतील लेखाजोखा मागितला आहे. यामुळे नव्यानेच मुख्य लेखाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे किरण भिलारे यांच्यावर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी (ता.११) फाईलवरून संजय आणि अजय चंदनानी या जय भारत कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी लेखा विभागातील लिपिक संदीप बिडलान यांना मारहाण केली होती. या प्रकरणी दोघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, व्हायरल झालेल्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये लिपिक संदीप याने प्रथम ठेकेदारावर हात उगारल्याचे दिसत आहे. अशातच महापालिकेचा लेखा विभाग बिल काढण्यासाठी दहा टक्क्यांची मागणी करतो, असा आरोप जयभारत कन्स्ट्रक्शनचे अमित चंदनानी आणि विजय सुखवानी यांनी केला. याबाबत २५ मार्च रोजी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे चंदनानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या लेटरबॉम्बसह मारहाण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----
मुख्य लेखाधिकाऱ्यांना निवेदन
यासंदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पष्टीकरण दिले. ज्यांनी १० टक्क्यांचे आरोप केले आहेत, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उल्हासनगर पालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांना निवेदन दिले आहे. त्यात लेखा विभागाच्या तिजोरीत जमा असलेली रक्कम किती आहे, मुख्य लेखाधिकारी पदावरून बदली झालेले विकास चव्हाण यांच्या १ जानेवारी २०२० ते ५ मे २०२२ पर्यंतच्या कालावधीतील रकमेतील देयक, बिले, कर्मचारी व कंत्राटदार यांना किती देण्यात आली याची माहिती मागितली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82136 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top