‘मॅक्सी कॅब’च्या परवानगीसाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मॅक्सी कॅब’च्या 
परवानगीसाठी समिती
‘मॅक्सी कॅब’च्या परवानगीसाठी समिती

‘मॅक्सी कॅब’च्या परवानगीसाठी समिती

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : राज्य सरकारने राज्यातील मॅक्सी कॅबला अधिकृत परवानगी देण्यासाठी निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेत पाच अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीकडून परवाना देण्याबाबत अभ्यास केला जाणार आहे. प्रवाशांची सोय, सुरक्षितता, वाहनाचे कर, एसटी महामंडळाच्या महसुलावर या योजनेमुळे होणारे संभाव्य परिणाम, सदर वाहनांकडून शासनास प्राप्त होणारा महसूल आणि त्या वाहनांना द्यावयाचे क्षेत्र, मार्ग, परवाना संख्या आणि इतरही बाबींचा अभ्यास करून ही समिती तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
सदर समितीमध्ये झा यांच्या अध्यक्षतेत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांचा समावेश आहे. सध्या एसटी बसस्थानकावरून खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवासी पळवत असून त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. शहरांसह ग्रामीण भागामध्येही अवैध प्रवासी टप्पा वाहतुकीचे जाळे पसरले आहे. याच बेकायदा वाहतुकीला राज्य सरकारने मॅक्सी कॅब धोरणांतर्गत अधिकृत परवाने दिल्यास एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे.
---------
अशी आहे समिती
- रामनाथ झा (सेवानिवृत्त भा.प्र.से.) - अध्यक्ष
- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त- सदस्य
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ- सदस्य
- जितेंद्र पाटील, अपर परिवहन आयुक्त- सदस्य
- अभय देशपांडे, परिवहन उपायुक्त, सदस्य, सचिव
---------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82138 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top