रमेश लटके यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमेश लटके यांचे निधन
रमेश लटके यांचे निधन

रमेश लटके यांचे निधन

sakal_logo
By

आमदार रमेश लटके यांचे निधन
मुंबई, ता. १२ ः अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत बुधवारी (ता. ११) रात्री निधन झाले. कुटुंबीयांसमवेत ते दुबईत गेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच माजी मंत्री रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू केली.
शिवसेनेच्या माध्यमातून एकेक पायरी चढत आलेले लटके हे अत्यंत लोकप्रिय आमदार होते. सलग दोनवेळा निवडून आलेले लटके नागरिकांच्या समस्या सोडवण्याची भूमिका घेत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मतदारसंघात शोककळा पसरली होती. लटके यांचे पार्थिव मुंबईत आणल्यानंतर उद्या (ता.१३) पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. लटके यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा मुलगी वृध्द आई वडिल असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
--
अभ्यासू आमदार हरपला : मुख्यमंत्री
अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82145 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top