
पिकअपच्या धडकेमुळे विजेचा खांब वाकला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः कल्याण शिळ रस्त्यावरील सोनारपाडा भागात महावितरणच्या मेन लाईनच्या २ व १२ नंबरच्या विजेच्या खांबाला एका पिकअप व्हॅनची जोरदार धडक बसली. त्यामुळे हा खांब वाकला आहे. खांब रस्त्याच्या दिशेलाच वाकल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु महावितरण अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. यामुळे या भागातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
शुक्रवारी (ता. १३) पहाटे ४ च्या सुमारास मालवाहू बोलेरो पिकअपने या खांबाला धडक दिली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात पिकअपचालक दिनेश नागणे (वय २६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे डोंबिवली व कल्याण पूर्वमधील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी वीजवाहिनीवरून या भागाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82163 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..