वसईत कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल
वसईत कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल

वसईत कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

नालासोपारा, ता १३ (बातमीदार) : वसईतील पापडी तलावाचे नादुरुस्त लोखंडी गेट एका चार वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी घडली होती. या घटनेला पालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर गुरुवारी (ता. १२) वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अभियंता फरारी असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

कुणाल पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून, तो प्रभाग क्रमांक १०९ मध्ये कार्यरत आहे. याच प्रभागात पापडी तलाव आहे. या तलावाचा लोखंडी गेट मागच्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ५ मे रोजी तलावावरील या लोखंडी गेटजवळ ४ वर्षांची भूमिका मेहेर ही चिमुरडी खेळत असताना तिच्या अंगावर तो गेट पडला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतरही वसई विरार महापालिकेला जाग आली नसून तो गेट अद्यापही दुरुस्त केलेला नाही. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी स्थानिकांनी तो गेट दोरीने बांधून ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82166 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top