आमदार रमेश लटके अनंतात विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार रमेश लटके अनंतात विलीन
आमदार रमेश लटके अनंतात विलीन

आमदार रमेश लटके अनंतात विलीन

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांचे दुबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले होते. त्यानंतर लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून शुक्रवारी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पार्ल्याच्या पारशी वाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश लटके दोन टर्म आमदार राहिले आहेत. सध्या अंधेरी पूर्व मतदारसंघातून ते आमदार होते. त्याआधी तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. कुटुंबीयांसोबत आपल्या मित्राच्या भेटीला दुबईला गेल्यावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. ५२ वर्षीय लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. तसेच शुक्रवारी सकाळी लटके यांचे पार्थिव कामगार कल्याण भवन येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर विलेपार्ले येथील पारशी वाडा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. लटके यांच्या निधनामुळे एक अत्यंत तळागाळातील, साधा आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82183 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top