कल्याण महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवली महापालिका
कल्याण महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना जाहीर

कल्याण महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना जाहीर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रामध्ये आज (शुक्रवार, ता. १३) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती माहिती पालिका मुख्यालयामध्ये केडीएमसी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाला वेग येणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १३३ असणार आहे. एकूण प्रभागांची संख्या ४४ असून तीन सदस्यांचे ४३ प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या १ लाख ५० हजार १७१ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२५८४ इतकी आहे. अनुसूचित जातीसाठी एकूण १३ जागा राखीव राहणार असून त्यापैकी ७ जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत.

अनुसूचित जमातीसाठी ४ जागा राखीव राहणार असून त्यापैकी २ जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी ५८ जागा राखीव राहणार आहेत. उर्वरित ५८ जागा या सर्वसाधारण असणार आहेत. अंतिम प्रभाग रचना ही सर्व प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर, महापालिका मुख्यालय व kdmcelection.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिका निवडणूक उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82184 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top