मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही
मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही

मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः मुंबई पालिकेच्या हद्दीत सर्व दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी ३१ मेपर्यंत कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. पालिकेने याबाबत पडताळणीसाठी काही पथकांची नेमणूक केली असून पाच हजार दुकाने पालिकेच्या रडारवर असल्याची माहिती आहे. त्यानुसार येत्या काळात या दुकानांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपूर्वीच नामफलकांमध्ये बदल करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

पालिकेच्या नियमानुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावर सुरुवातीला मराठी भाषेचा वापर केलेला असावा, तसेच मराठी भाषेतील टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरापेक्षा कमी ठेवता येणार नाही. याशिवाय ज्या अस्थापनांमध्ये मद्य पुरवले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापनांवर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिलेली नकोत, अशा पद्धतीने नामफलक प्रदर्षित केलेले असावेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय विभागीय कार्यालयातील व्यापारी संघटनांचे सदस्य तसेच आस्थापनांचे मालक यांची बैठक घेऊन फलक नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82185 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top