
नागरिकांच्या जीवाशी खेळू नका ः सोमैय्या
उल्हासनगर, ता. १३ (बातमीदार) ः अडीच लाख नागरिकांसाठी उल्हासनगरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. त्यांच्या जीवाशी खेळू नका, असे आवाहन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला केले. धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात किरीट सोमय्या सहभागी झाले होते.
इमारतींबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आलेला आहे. वसुलीसाठी पुनर्विकास थांबवला असेल तर ते बंद करा, असा टोला सोमय्या यांनी लगावला. वसुलीसाठी कुणी माफिया तुमच्याकडे आला तर त्याचा व्हिडीओ व्हायरल करा. भाजप तुमच्यासोबत आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष जमनु पुरस्वानी, माजी महापौर मीना आयलानी, संघटन मंत्री मनोहर खेमचंदानी, माजी नगरसेवक महेश सुखरामनी, राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी, शेरी लुंड, लाल पंजाबी, नरेन्द्र राजांनी, प्रकाश माखिजा, अजित सिंग लबाना, मनोज साधनानी, राजा गेमनानी, सुनील राणा, महासचिव मंगला चांडा, दीपक छतलानी, डॉ. बलराम कुमावत, अमित वाधवा, सुमित मेहरोलिया, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष फुलचंद यादव, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी मढवी, ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहलता कलशेट्टे, मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख, नीलेश बोबडे, बच्चन तोमर, लखी नाथानी आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82186 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..