सुर्या नदीपात्रात पाणमांजराचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुर्या नदीपात्रात पाणमांजराचे दर्शन
सुर्या नदीपात्रात पाणमांजराचे दर्शन

सुर्या नदीपात्रात पाणमांजराचे दर्शन

sakal_logo
By

मनोर, ता. १३ (बातमीदार) ः पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील सूर्या नदीपात्रात मासवन गावच्या हद्दीत दुर्मिळ पाणमांजर आढळून आले आहे. पाणमांजराच्या दर्शनाने नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे; पण सूर्या नदीपात्रात स्फोटके आणि कीटकनाशकांचा वापर करून अवैध मासेमारी केली जात आहे. त्यामुळे पाणमांजराचे संरक्षण करण्याची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पाणमांजर हा सस्तन मांसाहारी गणातील मुस्टेलिडी कुळातला प्राणी आहे. पाणमांजराला इंग्रजीत ऑटर म्हटले जाते. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि भारताबाहेर ब्रह्मदेश, इंडोचायना आणि मलायात हा प्राणी आढळतो. त्याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर पाणमांजराचे वास्तव्य आढळते. पाणमांजराचे भक्ष्य नदीतील मासे आणि खेकडे असतात. त्याचे बिळ नदीकिनाऱ्यावर असते. पाणमांजराचा खाद्य आवाका मोठा आहे. नदी पात्रात मोठ्या चपळाईने माशांचा पाठलाग करून माशांची शिकार करणारे पाणमांजर मनुष्याच्या हाती सहसा लागत नाही. मगरदेखील शक्यतो पाणमांजराच्या वाटेला जात नाही.

दरम्यान, सूर्या नदीपात्रात आढळलेल्या पाणमांजराच्या संरक्षणासाठी अवैध मासेमारी रोखण्याची गरज आहे. सूर्या नदीत आढळून आलेल्या पाणमांजराच्या प्रजातीची माहिती घेऊन त्याचे संरक्षण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. पाणमांजराचा नदीच्या परिसंस्थेला धोका नसून त्याचे वास्तव्य हिताचेच आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये जनजागृती मोहीम राबवून पाणमांजराची शिकार रोखण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
------------

सूर्या नदीपात्रात पाणमांजर आढळल्याबाबत माहिती घेतो. संबंधित वनपाल आणि कर्मचाऱ्यांना पाणमांजराच्या संरक्षणासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- गणेश परहार, वनपरिक्षेत्र अधिकारी, पालघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82189 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top