मुख्यमंत्री आज विरोधकांवर तोफ डागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री आज विरोधकांवर तोफ डागणार
मुख्यमंत्री आज विरोधकांवर तोफ डागणार

मुख्यमंत्री आज विरोधकांवर तोफ डागणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असे पोस्टर आणि व्हिडीओ टीझरद्वारे शिवसेनेने कार्यकर्त्यांना १४ मेच्या शिवसंपर्क अभियानाच्या सभेला येण्याची साद घातली आहे. बीकेसीच्या मैदानातून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या आजच्या पहिल्या सभेला शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील. या वेळी हिंदुत्व हा मुद्दा केंद्रस्थानी असून मुख्यमंत्री विरोधकांवर जोरदार तोफ डागणार, हे स्पष्ट आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांचा या सभेत समाचार घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री मुंबईत मेगा रॅलीत राज ठाकरे, भाजप यांच्यावर जोरदार पलटवार करतील, असा अंदाज आहे. मुंबई व राज्यभरातील सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. वांद्रेतील बीकेसी मैदानाची क्षमता लाखोंची आहे. त्यासाठी शिवसैनिकांना मोठ्या ताकदीने सभेत सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. यासाठी बीकेसी मैदानात मोठे स्टेज उभारणीचेही काम गतीने सुरू होते.

इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
मुंबईतील अनेक शाखा आणि उपाध्यक्षांचे या सभेच्या निमित्ताने आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता शक्तिप्रदर्शन असणार आहे. अनेक भागांत बसेस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात पदाधिकारी गुंतले आहेत; तर पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार ही सभा अभूतपूर्व होईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82190 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top