
दाऊद टोळीचे दोन गुंड अटकेत
मुंबई, ता. १३ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीच्या अवैध कृत्यांशी संबंधित दोघा गुंडांना एनआयएने मुंबईतून काल अटक केली. गुंड अबूबकार शेख आणि शब्बीर अबूबकार शेख अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत. हे दोघे छोटा शकील साथीदार आहेत. सध्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम व त्याच्या टोळीच्या अवैध कृत्यांचा तपास एनआयए करत आहे.
दाऊद इब्राहिम, हाजी अनीस, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन यांनी देशात शस्त्रांची तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार तसेच मनी लाँडरिंग यांच्या साह्याने अवैध कृत्ये करण्याची मोठी कारस्थाने रचली आहेत. ही टोळी लष्कर-ए-तय्यबा, जैशे मोहम्मद, अल-कायदा यांच्यासोबत घातक कृत्ये करण्यासाठी मालमत्ता व पैसे जमवत आहे. या कामासाठी दाऊद कंपनीला सहाय्य करणारे दोन गुंड अबूबकार शेख व शब्बीर अबूबकार शेख यांना अनुक्रमे गोरेगाव आणि मिरा रोड येथून अटक करण्यात आली. हे दोघेही दाऊद कंपनीच्या अवैध कृत्यांमध्ये गुंतले होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अतिरेकी कृत्यांना अर्थसहाय्य करण्यात दाऊद टोळीला ते मदत करत होते, असे एनआयएने स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82195 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..