मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप
मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप

मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप

sakal_logo
By

ठाणे, ता १४ ः आपल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या जन्मदात्या पित्याला ठाणे विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी शुक्रवारी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना नवी मुंबईत २०१७ मध्ये घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले.
आरोपीने आपल्या १३ वर्षीय मुलीवर २०१७ मध्ये अत्याचार करत तिला गरोदर केले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आल्यावर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. तपास पूर्ण करत पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि ७ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २५ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी तपास केला. पेहरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार यांनी, तर कोर्ट अमलदार म्हणून सहाय्यक फौजदार शिवाजी कवरे यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82197 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top