भिवंडी ग्रामीणमध्ये पाण्यासाठी जागरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी ग्रामीणमध्ये पाण्यासाठी जागरण
भिवंडी ग्रामीणमध्ये पाण्यासाठी जागरण

भिवंडी ग्रामीणमध्ये पाण्यासाठी जागरण

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता.१३ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पाणीसंकट निर्माण झाले आहे. त्यात स्टेम प्राधिकरणाकडून ग्रामीण भागात रात्री उशिरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची वाट पाहत जागरण करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे.
पाणी उशिरा येत असल्याने नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागते. रात्री दोन ते पहाटे चार या दरम्यान पाणी येत असल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे होते. शिवाय पुरेसे पाणी मिळेलच याची शाश्वती नागरिकांना नसते. त्यामुळे रात्री, तसेच पहाटे पाणी सोडणाऱ्या स्टेम प्राधिकरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भिवंडीतील ग्रामीण भागातील कालवार, वडघर, डुंगा, कारिवली, खारबाव आदी भागांना स्टेम वॉटरकडून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र, स्टेम प्राधिकरणाकडून या वसई रोडवरील गावांना होणारा पाणीपुरवठा रात्री उशिरा होत असल्याने पाणी भरण्यासाठी महिलावर्गाला रात्री दोनपासून ते पहाटे चारपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. या पाणी संकटामुळे महिला व नोकरदारांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.

आंदोलनाचा इशारा
स्टेम प्राधिकरणाने दिवसभरात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून वारंवार होत आहे. स्टेम प्राधिकरणासह स्थानिक ग्रामपंचायतींमध्ये नागरिक वारंवार पाण्यासंदर्भात तक्रारी देत असूनदेखील स्टेम प्राधिकरण नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्टेम प्राधिकरणाने नागरिकांच्या समस्येचा लवकरात लवकर निपटारा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82201 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top