दोन रुपयांच्या वादातून बसवाहक, चालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन रुपयांच्या वादातून 
बसवाहक, चालकाला मारहाण
दोन रुपयांच्या वादातून बसवाहक, चालकाला मारहाण

दोन रुपयांच्या वादातून बसवाहक, चालकाला मारहाण

sakal_logo
By

पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : दोन रुपयांच्या वादातून एका प्रवाशाने एनएमएमटीच्या वाहकासोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला. विशेष म्हणजे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बसचालकालाही या प्रवाशाने मारहाण केली. वसीम रफिक खोत (वय ३०) असे या प्रवाशाचे नाव असून बसमधील प्रवाशांनीच त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

नवी मुंबई महापालिका परिवहनच्या (एनएमएमटी) तुर्भे डेपोत कार्यरत असलेले वाहक सूरज भोईर व चालक शेखर मंडलिक हे दोघे गुरुवारी (ता. १२) वाशी ते खोपोली या बसवर कार्यरत होते. सकाळच्या सुमारास पनवेलमध्ये चढलेल्या वसीम खोत याला वाहकाने खोपोलीचे ४४ रुपयांचे तिकीट दिले. यावेळी वसीमने खोपोलीचे भाडे ४२ रुपये असल्याचे सांगून ४४ रुपयांचे तिकीट कसे घेतले, अशी विचारणा केली. यावेळी वाहक भोईर हे त्याला बसच्या भाड्याबाबत समजावून सांगत असताना वसीमने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्याने वसीमने भोईर यांना मारहाण केली. त्यामुळे बसचालक मंडलिक यांनी सदर बस उभी करून ते भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र वसीमने त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82204 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top