
अंनिसतर्फे राज्यभर जनप्रबोधन यात्रा
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था यांच्या वतीने १४ मे ते २३ मे २०२२ या कालावधीत ‘वारसा संतांचा... अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ या नावाने महाराष्ट्रभर जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस नितीशकुमार राऊत यांनी दिली. संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीपासून या प्रबोधन यात्रेची सुरुवात होणार आहे. मुक्ताईनगर, निफाड, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू, पिंपळनेर, सासवड, श्रीगोंदा, आपेगाव, पैठण, दौलताबाद, नसरी नामदेव, गंगाखेड, परळी, मंगळवेढा अशा ठिकाणी या यात्रेचे कार्यक्रम होणार आहे. यात्रेचा समारोप पंढरपूर येथे होणार आहे. या प्रबोधन यात्रेत कीर्तन, प्रवचन होणार आहेत. ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, हरिदास तम्मेवार, मनोहर जायभाये, हनुमंत मुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82207 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..