
तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा
खारघर, ता. १४ (बातमीदार) : सोळा वर्षांची मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिमांशू दिलीप कुडेकर (वय २०) याला अटक केली.
खारघरमध्ये मुलीचे पालक आणि आरोपी मुलगा शेजारी राहत असल्यामुळे दोघांची ओळख झाली. ओळखीतून मैत्रीत रूपांतर झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे पालक कामावर गेल्यावर हे दोघेही बाहेर फिरायला जात असत. दरम्यान, त्यांच्यात लैंगिक संबंध निर्माण झाले. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे पालकांनी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरने सदर मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीकडे विचारणा केली असता, शेजारी राहणाऱ्या मुलासोबत लैंगिक संबंध असल्याची माहिती दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने अखेर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलगी गर्भवती असल्याने बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82208 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..