ओबीस आरक्षणासाठी पुन्हा मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीस आरक्षणासाठी पुन्हा मैदानात
ओबीस आरक्षणासाठी पुन्हा मैदानात

ओबीस आरक्षणासाठी पुन्हा मैदानात

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १४ (बातमीदार)ः आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी समाज, संघटना पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. राजकीय आरक्षण, तसेच घटनेतील ३४० कलमांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या नेतृत्वात १७ मे रोजी सर्वपक्षीय ओबीसी संघटना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण धोक्यात आहे. महाराष्ट्रातील २७,७८२ ग्रामपंचायतींमधील साधारणत: ५१,५०० तसेच ३५१ पंचायत समित्यांमधील १,००० आणि ३४ जिल्हा परिषदांमधील ५३५, तर शहरी भागातील ३६९ नगर परिषद/नगर पंचायतींमधील साधारण २,१०० व २७ महापालिकांमधील ७४० अशा सर्व मिळून ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर या निकालाचा परिणाम होणार आहे.
मंगळवारी (ता. १७) आझाद मैदान, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये ४ ते ५ हजार लोक महाराष्ट्रातून येणार आहेत, असेही सांगण्यात आले.
...
विविध मागण्या
१. ओबीसींची जातनिहाय जनगणना तत्काळ करावी.
२. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ३४० कलम लागू केले आहे. त्याची पूर्ण अंमलबजावणी करावी. मंडल आयोग जसाच्या तसा लागू करावा.
३. भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी एसटी प्रवाहात समाविष्ट करावे.
४. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्वरित पूर्ण करावे.
५. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक त्वरित पूर्ण करावे.
६. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी मिळावा.
७. मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे.
८. ५२ टक्के राजकीय आरक्षण ओबीसी यांना तत्काळ मिळावे.
९. ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवून इतर जातींनाही आरक्षण द्यावे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82209 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top