चार भाषांमध्ये कवितांचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार भाषांमध्ये कवितांचा विक्रम
चार भाषांमध्ये कवितांचा विक्रम

चार भाषांमध्ये कवितांचा विक्रम

sakal_logo
By

प्रकाश लिमये ः भाईंदर

अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने निरनिराळे विक्रम नोंदवतात. साहित्यातही असे विक्रम नोंदवले जातात. भाईंदरच्या अंजली मुकेशकुमार जैन या अवघ्या २२ वर्षीय तरुणीने एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच चार भाषांमध्ये विविध विषयांवरील १०१ कवितांचे लिखाण करून तिने जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. तिच्या या कवितांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
-----

अकाऊंट्स अँड फायनान्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली अंजली हिचे करिअर खरे तर या क्षेत्रातच घडायला हवे होते. शिवाय वडिलांचाही व्यवसाय असल्यामुळे साहित्याशी तसा घरातील कोणाचाही संबंध नव्हता. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली आणि या घटनेने ती साहित्याकडे वळली. मनातील विचार आणि भावना व्यक्त करण्याची संधी तिला कवितेच्या रुपाने मिळाली आणि ती उत्स्फूर्तपणे कविता लिहू लागली. आजच्या तरुणाईची भाषा म्हणजे इंग्रजाळलेली. त्यामुळे तिने कविताही `हिंग्लिश` म्हणजेच हिंदी आणि इंग्रजीचा मिलाफ असलेल्या भाषेतून करायला सुरुवात केली. मात्र त्याचबरोबर हिंदी, गुजराती, इंग्रजी या भाषेतूनही तिचे लिखाण सुरू आहे.
अवघ्या २२ व्या वर्षी तिने चार भाषांत विविध विषयांवरील १०१ कविता लिहिल्या. या कवितांच्या ‘इंकिंग इमोशन` या तिच्या पुस्तकाला जागतिक विक्रमामध्ये स्थान मिळाले असून ग्लोरियस बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंकझोईड बुक ऑफ रेकॉर्ड्स या प्रतिष्ठेच्या संस्थांकडून तिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. एखाद्या विशिष्ट विषयावरील कवितांची जागतिक विक्रमामध्ये याआधी नोंद झाली आहे; परंतु चार भाषांत विविध विषयांवर कविता लिहिण्याचा हा पहिलाच विक्रम आहे.

साहित्यात करिअर करायची इच्छा!
अंजलीच्या कविता कोणत्याही एका विषयाला समर्पित नाहीत. देशभक्ती, व्यक्ती, भावना, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर तिला लिहिण्याची आवड आहे. लोकांमध्ये जास्तीत जास्त मिसळणे तिला आवडते. यातूनच तिला आपल्या कवितांचे विषय सुचतात. सुचलेल्या विषयावर विविध अंगांनी संशोधन करून आपली कविता परिपूर्ण करण्याची तिची सवय आहे. वडिलांच्या व्यवसायात मदत करत असतानाच साहित्यातही तिला करिअर करायची इच्छा असून, कविसंमेलनातही सहभागी व्हायचे आहे. कवितांव्यतिरिक्त अंजलीला ब्लॉगही लिहायची सवय आहे. तसेच तिने आतापर्यंत ६०० हून अधिक सुविचारही लिहिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82211 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top