विधवा प्रथेबाबत ठोस पावले उचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा प्रथेबाबत ठोस पावले उचला
विधवा प्रथेबाबत ठोस पावले उचला

विधवा प्रथेबाबत ठोस पावले उचला

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः विधवांना समाजात समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींनी क्रांतिकारी निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. या दोन गावांनी घालून दिलेला आदर्श लक्षात घेऊन राज्य सरकारने जनजागृती करावी आणि विधवा प्रथाबंदीसंदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुरेशचंद्र राजहंस यांनी पत्र पाठवले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पतीच्या निधनानंतर आजही महिलांना उपेक्षित आणि भेदभावाचे जीवन जगावे लागत आहे. विधवांना कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांत डावलले जाते. महिलांचे खच्चीकरण करणाऱ्या अशा वाईट प्रथांविरोधात समाजसुधारकांनी प्रयत्न केले आहेत. पतीच्या निधनानंतर आजही पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडण्याचे दुष्कृत्य रूढीपरंपरेच्या नावाखाली केले जाते. हे सर्व बंद झाले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गावांनी विधवा प्रथा बंद करण्याचा जो क्रांतिकारक निर्णय घेतला आहे त्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी शासन स्तरावर योग्य तो विचार होऊन त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलावीत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82212 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top