पालघरमधील महिलांना सरकारी `आधार` | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमधील महिलांना सरकारी `आधार`
पालघरमधील महिलांना सरकारी `आधार`

पालघरमधील महिलांना सरकारी `आधार`

sakal_logo
By

प्रसाद जोशी, वसई

महिलांच्या कल्याणकारी योजना, शिक्षण किंवा कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या महिलांना राहण्याची व्यवस्था अशा सर्व सुविधा पालघरमध्ये एकाच छताखाली मिळणार आहेत. जिल्ह्यात महिला भवन केंद्राची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी पाच एकर जागेचा प्रस्ताव आहे. या महिला भवनामुळे गरजू महिलांची परवड थांबण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील परित्यक्ता, एकाकी जीवन जगणाऱ्या निराधार, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी विविध सरकारी योजना असून, त्यातून रोजगार, व्यवसायाची संधी उपलब्ध होते. सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून असलेल्या या योजनांची माहिती घेण्यासाठी विविध कार्यालये महिलांना पालथी घालावी लागतात. त्यातच या विभागातून दुसऱ्या विभागात हेलपाटे मारून त्यांची दमछाक होते.
अशा योजनांची माहिती महिलांना एकाच ठिकाणी मिळावी, योजनेचे सरकारी सोपस्कार वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून महिला भवन केंद्रात महिला व बालकल्याणसह महिलांच्या विविध योजनांसंबंधी असलेले विभाग एकत्रित आणले जाणार आहेत. शिक्षण, नोकरीसाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या महिलांना राहण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसते. अशा वेळी भाड्याचे घर, जागेची शोधाशोध करावी लागते. अशा महिलांसाठी या भवनामध्ये वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. त्याद्वारे महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याची योजना आहे.

जागेची निश्‍चिती
१) पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी महिला भवनाच्या निर्मितीसाठी पावले उचलली आहेत. याकरिता पालघर पोलिस परेड मैदानाच्या शेजारी पाच एकर जागा निश्चित केली आहे. या जागेवर भवन उभारण्यात येणार आहे.
२) जिल्हाधिकारी कार्यालयाला ५ कोटींचा निधी पूर्वी राखीव होता; परंतु त्यात वाढ होऊन १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून महिला भवन केंद्रासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

वन स्टॉप महिला सेंटर
जिल्ह्यातून येणाऱ्या महिलांना एकाच ठिकाणी थांबता यावे, याकरिता ‘वन स्टॉप सेंटर’ची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लवकरच नवनगर हे नवे रेल्वेस्थानक होणार आहे. या स्थानकाच्या बाजूलाच महिला केंद्राच्या जागेचा प्रस्ताव आहे.

महिलांशी संबंधित योजना व कार्यालये याचा लाभ एकाच ठिकाणी गरजू महिलांना घेता यावा, यासाठी महिला भवन केंद्र, वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल.
- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82216 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top