ऑन ड्युटी - देशसेवेबरोबर कबड्डीच ध्यास अन्‌ श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑन ड्युटी - देशसेवेबरोबर कबड्डीच ध्यास अन्‌ श्वास
ऑन ड्युटी - देशसेवेबरोबर कबड्डीच ध्यास अन्‌ श्वास

ऑन ड्युटी - देशसेवेबरोबर कबड्डीच ध्यास अन्‌ श्वास

sakal_logo
By

- रजनीकांत साळवी

सण, उत्सव, सोहळे सारे काही विसरून पोलिसांना ‘२४ तास ऑनड्युटी’ राहावे लागते. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असावे लागते. एखादी घटना घडल्यास लागलीच ड्युटीवर यावे लागते. अशा परिस्थितीतही देशसेवेचा वसा अंगिकारलेल्या मनोज नमसले हे देशसेवेबरोबरच कबड्डी या खेळाची आवड जोपासत असून, कबड्डी हाच ध्यास आणि श्वास मानून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत.
-----
कीर्ती महाविद्यालयात १२ वीला असताना मनोज यांनी कबड्डीची सुरुवात केली. त्या वेळेस कबड्डीसाठी कॉलेजचा संघ पूर्ण होत नव्हता, तेव्हा मित्र अविनाश नागवेकर, अमित खाटपे यांनी त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त केले. तिथून पुढे कबड्डीचा प्रवास सुरू झाल्याचे ते सांगतात. मनोज यांनी यंग प्रभादेवी क्रीडा मंडळात सभासदत्व स्वीकारून सराव सुरू केला. यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि कबड्डी प्रशिक्षक रवींद्र देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले; तर खेळाडू सुधीर गावडे, सागर भोगटे, चेतन खाटपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव करू झाला आणि कबड्डीची गोडी लागली, असे मनोज यांनी सांगितले.
१९९७ मध्ये प्रथमच मुंबई शहर ज्युनियर कबड्डी संघात त्यांची निवड झाली आणि नगर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धेकारिता मुंबई शहर संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. यात मनोज यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्याच वर्षी केरळ येथे होणाऱ्या ज्युनियर स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघातदेखील निवड झाली आणि संघाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
मनोज नमसले २००० मध्ये पोलिस दलात भरती झाल्यानंतर पोलिसांसाठी असणाऱ्या स्पर्धेत नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा विविध ठिकाणी राज्यस्तरीय, ऑल इंडिया कबड्डीच्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे स्वीकृत सदस्य म्हणूनदेखील त्यांची निवड करण्यात आली. त्याच वेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आलेल्या मुलींच्या संघाने महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. गेली २२ वर्षे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या मनोज यांना आतापर्यंत अनेक पारितोषिक मिळाली आहेत. आजही ते ड्युटी करून जो वेळ मिळतो, त्या वेळेत कबड्डीचा सराव करतात. मुला-मुलींच्या संघाला मार्गदर्शन करत आवडत जोपासून यापुढेही कबड्डीचा प्रसार सुरू ठेवण्याची इच्छा मनोज यांनी व्यक्त केली.

दररोज एक तास सराव
प्रभादेवी येथे राहणारे मनोज नमसले सध्या लाचलुचपत विभागात पोलिस नाईक म्हणून कार्यरत आहेत. पोलिस सेवेतील कर्तव्य आणि कबड्डी खेळाची आवड अशा दोन्ही बाजू सांभाळताना कर्तव्यात कधी उणीव भासू दिली नाही. कामावरून घरी परतल्यावर दररोज एक तास कबड्डीचा सराव करायचा, हा त्यांचा नित्यक्रम आहे. शालेय जीवनात खो-खो खेळाची आवड होती; मात्र महाविद्यालयीन जीवनापासून कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82217 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top