देहरंगमध्ये दहा दिवसांचा पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहरंगमध्ये दहा दिवसांचा पाणीसाठा
देहरंगमध्ये दहा दिवसांचा पाणीसाठा

देहरंगमध्ये दहा दिवसांचा पाणीसाठा

sakal_logo
By

पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणात दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांतच सिडको वसाहतीबरोबरच शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यंदा लवकर पाऊस न आल्यास पनवेलकरांना टँकरशिवाय पर्याय राहणार नाही.

पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या देहरंग धरणातील पातळी खालावली आहे. गळती, नादुरुस्ती आणि धरणात साचलेला गाळ या पनवेलकरांच्या पाणी नियोजनातील प्रमुख समस्या आहेत. एकट्या पनवेल शहराला २९ एमएलडी पाण्याची गरज आहे. पाताळगंगामधून मिळणारे पाणी आठवड्याभरापासून दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मिळत नाही व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने येते. या धरणाची क्षमता कमी असल्याने महापालिका देहरंग धरणातून दररोज ८ एमएलडी पाणी घेते.

१७ एमएलडी पाणी विकत घेण्याची वेळ
महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १२ एमएलडी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५ एमएलडी पाणी विकत घ्यावे लागते. पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना मुबलक पाणी मिळावा, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पनवेल महापालिकेला अमृत योजना मिळाली आहे.

कोरोनामुळे कामाला विलंब
केंद्र सरकारपुरस्कृत अमृत योजनेनुसार महापालिका हद्दीतील २९ महसूल गावांत एकूण ४० पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यासोबत गावांमध्ये अंतर्गत एकूण १६५ किलोमीटर नवीन पाईपलाईन जोडणी करण्यात येणार आहे, पण कोरोनामुळे हे काम पूर्ण होण्यास उशीर झाला आहे.

देहरंग धरणात डोंगरावरून येणाऱ्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी कमी साठते. हा गाळ काढणे खर्चिक आहे. आता थोडा जरी पाऊस पडला तरी धरणातून आम्ही ८ एमएलडी पाणी घेतो. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल.
- विलास चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82224 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top