मुलुंडमधील मॅनहोल्सची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमधील मॅनहोल्सची दुरवस्था
मुलुंडमधील मॅनहोल्सची दुरवस्था

मुलुंडमधील मॅनहोल्सची दुरवस्था

sakal_logo
By

मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः महापालिकेच्या वतीने शहरात पावसाळ्यापूर्वीचे सफाईचे काम सध्या जोरात सुरू आहे. मुलुंडमधील मॅनहोलच्या दुरवस्थेकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. अनेक मॅनहोल धोकादायक अवस्थेत असून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलुंड पश्चिमेतील एन. एस. रोडवरील मॅनहोलची अवस्था खूपच खराब आहे. येथील मॅनहोलला बांबू आणि टेप लावून झाकले असले, तरी या ठिकाणी नवीन मॅनहोलचे झाकण बसवण्यात यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रमुख रस्त्यांवरील मॅनहोलचे झाकण तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. काही ठिकाणी झाकणे गायब असल्याचे भयानक चित्र आहे. मुलुंड पश्चिमेतील पाच रस्ता येथील मॅनहोलचे झाकण तुटून आत पडले आहे. म्हाडा कॉलनी येथील मॅनहोलचे झाकण तुटले असून तुटलेले झाकण वापरून सदर मॅनहोल झाकून ठेवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82237 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top