ओव्हरलोड वाहतुकीकडे कानाडोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हरलोड वाहतुकीकडे कानाडोळा
ओव्हरलोड वाहतुकीकडे कानाडोळा

ओव्हरलोड वाहतुकीकडे कानाडोळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः राज्यातील ग्रामीण, शहरी रस्त्यांवर सर्रास ओव्हरलोड वाहनांची वाहतूक होत असताना राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत अशा वाहनांच्या तपासणीचा आकडा गेल्या महिन्याभरात तळाला गेला आहे. आरटीओकडे भरारी पथके आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची मुबलक संख्या असताना केवळ ८९५९ वाहनांची तपासणी होऊन फक्त १,६०३ वाहने क्षमतेहून अधिक मालवाहतूक करण्यासाठी दोषी ठरवली गेली आहेत. परिवहन विभागाच्या आकडेवारीवरूनच हे निष्पन्न झाले आहे.

वाळू, डंपर, मुरूम किंवा बांधकामांच्या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांतून सर्रास ओव्हरलोड मालवाहतूक होत असल्याचे आढळते आहे. महामार्गावरही असा बेकायदा प्रवास केला जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचदा वाळू, मुरूम कशानेही झाकले जात नसल्याने इतर वाहतुकींवरही त्याचा परिणाम होताना दिसतो.

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून रस्त्यांवर खड्डे पडून अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यानंतरही परिवहन विभागाकडून ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, उपनगरांमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांवरही मालवाहतुकीची वाहन ओव्हरलोड वाहतूक करताना दिसून येत असतानाही, त्यावर कारवाई घटल्याचे चित्र परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

एप्रिल महिन्यातील ओव्हरलोड वाहनांवरील कारवाई
विभागाचे नाव - तपासलेली वाहने - दोषी वाहने - एकूण महसुलाची वसुली (लाखांत)
मुंबई - ८७१ - १०८ - ४७.२४
ठाणे - २०२८ - २१६ - ६६.८९
पनवेल - ९२२ - १३० - ८०.९०
कोल्हापूर - २७६ - ७१ - ४९.२८
पुणे - ८३५- २२७ - ११८.२७
नाशिक - १३४४ - २८८ - १०१.३५
धुळे - ७७० - ७१ - ३९.७६
औरंगाबाद - ३४४ - ५२ - २०.२३
नांदेड - ४०१ - ६९ - २९.४०
लातूर - २११ - ७० - ३२.१३
अमरावती - २६० - ८२ - ३८.५०
नागपूर शहर - १२३ - ६३ - २८.९२
नागपूर ग्रामीण - ५७३ - १५६ - ६४.६८
एकूण - ८९५८ - १६०३ - ७१७.६०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82239 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top