टँकर लॉबी केंद्राविरोधात एकवटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टँकर लॉबी केंद्राविरोधात एकवटली
टँकर लॉबी केंद्राविरोधात एकवटली

टँकर लॉबी केंद्राविरोधात एकवटली

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या मार्गदर्शकांनुसार मुंबईतील पाणीउपशासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक केले आहे. मात्र, या निर्णयाला शहरातील टँकर लॉबीने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून टँकर असोसिएशनने संपाचा पवित्रा घेतला होता; परंतु राज्याच्या हस्तक्षेपामुळे हा संपाच पवित्रा नरमला आहे. शहरात बांधकामांसाठी व रहिवासी सोसायट्यांना या टँकर लॉबीद्वारे पाणीपुरवठा होतो.

संपकरी टँकर असोसिएशनने केंद्र सरकारच्या मार्गदर्शकांचा मुद्दा राज्यापुढे मांडला होता. त्यावर केंद्राकडे याबाबत प्रेझेंटेशन सादर केले जाईल, असे आश्‍वासन राज्य सरकारकडून मिळाल्याने असोसिएशनने संप मागे घेतला आहे; मात्र केंद्राच्या नव्या धोरणाबाबत मुंबई टँकर असोसिएशनमध्ये नाराजीचा सूर आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरातील पाणीउपशासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक केले आहे; परंतु हे प्रमाणपत्र घेणे व्यवहार्य नसल्याचे सांगून मुंबईतील पाणी टँकरचालक १० मेपासून संपावर गेले होते.

राज्य सरकारने यात हस्तक्षेप करत धोरणांवर प्रेझेंटेशन सादर करून केंद्राला माहिती दिली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले आहे. यानंतर तूर्तास असोसिएशनने हा संप मागे घेतला आहे. प्रतिटँकर भरावी लागणारी रक्कम तसेच विहिरीभोवती जागेच्या अटीला असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. मुंबईत जागेअभावी पुरवठादार जागेची अट पूर्ण करू शकत नसल्याने या धोरणाला विरोध करत असल्याचे टँकर असोसिएशनने स्पष्ट केले.

विरोधाची कारणे
- एका विहिरीतून १५ टँकर पाणी काढता येणार.
- प्रतिटँकर १०० रुपये रक्कम भूजल प्राधिकरणाकडे वर्षासाठी आगाऊ भरावी लागणार.
- प्रतिटँकर शंभर रुपयांप्रमाणे वर्षासाठीची आगाऊ रक्कम ५,४७,५०० रुपये इतकी होते.
- फूटपाथ, रस्त्यावर पाणी भरण्यास मनाई
- विहिरीभोवती २०० चौरस मीटर जागा असावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82242 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top