महिलेच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा आरोपी जेरबंदजेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा आरोपी जेरबंदजेरबंद
महिलेच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा आरोपी जेरबंदजेरबंद

महिलेच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा आरोपी जेरबंदजेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.१४ (वार्ताहर) : लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल खेचणारा तुषार शाम रॉय (१९) हा लुटारू पोलिसांच्या हाती लागला आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याने चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. या घटनेतील तक्रारदार वंदना हरेल (३६) या कोपरखैरणेत कुटुंबासह राहण्यास असून त्या सीवूडस् येथील कंपनीत काम करतात. १२ मे रोजी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर वंदना या कोपरखैरणे येथे जाण्यासाठी सीवूडस रेल्वे स्टेशनवर लोकल पकडण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या ठाणे लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात चढल्यानंतर लोकल सुरू होताच लोकलमध्ये चढलेल्या आरोपी तुषार शाम रॉय याने वंदना यांच्या हातातील मोबाईल खेचून चालू गाडीतून फलाटावर उडी मारून पळ काढला. यावेळी वंदना यांनीही सदर लुटारूच्या पाठोपाठ फलाटावर उडी मारल्यामुळे त्या खाली पडून त्यांच्या डोक्याला मुका मार लागला. मात्र, त्यानंतरही वंदना यांनी लुटारूचा पाठलाग केला. यावेळी ड्युटीवरील पोलिसांनी सदर लुटारूला रेल्वे प्रवाशांच्या मदतीने पकडून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात वंदना यांचा चोरलेला १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल सापडला. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी आरोपी तुषार शाम रॉय याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82248 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top