पनवेलमधील व्यावसायिकाकडून १० लाख उकळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमधील व्यावसायिकाकडून १० लाख उकळले
पनवेलमधील व्यावसायिकाकडून १० लाख उकळले

पनवेलमधील व्यावसायिकाकडून १० लाख उकळले

sakal_logo
By

पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : कमी किमतीत सोने विकत घेण्याचा मोह पनवेलमधील एका व्यावसायिकाच्या अंगलट आला आहे. एका भामट्याने व्यावसायिकाला खोटे सोने देऊन त्यांच्याकडून तब्बल १० लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले व्यावसायिक लुईस कोलासो (६३) हे पनवेलमध्ये राहण्यास असून त्यांचे चष्माविक्रीचे दुकान आहे. जानेवारीमध्ये एक भामटा त्यांच्या दुकानात चष्मा खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. या वेळी सदर भामट्याने त्याला पैशांची अत्यंत गरज असल्याने त्याच्याकडे असलेले काही सोने विकायचे आहे, असे सांगितले. कोलासो यांनी सदर भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे असलेले सोने खरेदी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर भामट्याने १० लाख रुपये घेऊन कामोठे, सेक्टर-२२ मध्‍ये येण्यास सांगितले. त्यानुसार कोलासो गेले असता, भामट्याने १० लाख रुपये घेऊन त्यांना आपल्याजवळचा खोट्या सोन्याच्या हाराचा गुच्छ देत त्या ठिकाणावरून पलायन केले. दोन दिवसानंतर कोलासो यांनी सोनाराकडे जाऊन सोन्याच्या गुच्छाची तपासणी करून घेतली असता, ते खोटे सोने असल्याचे सोनाराने सांगितले. त्यानंतर कोलासो यांनी भामट्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82249 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top