महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर
महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर

महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ : वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गृहनिर्माण तथा अल्पसंख्याक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे -पालघर विभागाध्यक्षा ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा केल्या जात आहेत. मात्र, महागाई कमी होत नाही. आता महागाई कमी कधी होणार, याची घोषणा कधी करतात याची आम्ही वाट बघतोय, अशी टीका ऋता आव्हाड यांनी केली.
सिलिंडर महागल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळेच इंधन व स्वयंपाक गॅसची दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईचा भस्मासूर, पगार कपात, नोकरी, जाण्याची भीती, त्यात सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ, स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल आदी फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी ऋता आव्हाड म्हणाल्या की, महागाईवर खूप आंदोलने झाली. बैलगाड्या, सिलिंडर, चुलीवर भाकऱ्या भाजूनही आंदोलने केली. आता स्टोव्ह पेटवण्यासाठीही रॉकेल मिळत नाही. उज्ज्वला योजनेचा खूप गाजावाजा करण्यात आला. पेट्रोल पंपावर अजूनही पोस्टर दिसत आहेत. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना थोडीतरी भीड असेल तर ते पोस्टर्स त्यांनी उतरवायला हवेत. उज्ज्वला योजनेमध्ये जेवढ्या लोकांना सबसिडी मिळाल्या. ते सगळेच आता चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82250 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top