वयोवृद्ध मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वयोवृद्ध मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेप
वयोवृद्ध मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेप

वयोवृद्ध मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : नाष्टा बनविला नाही, या कारणावरून वयोवृद्ध शोभा गणेश कुलकर्णी (७५) या मावशीवर चाकूने डोक्यावर आणि डोळ्यावर वार करून हत्या करणाऱ्या स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९) या भाचीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी शुक्रवारी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ठाण्यात २०१८ मध्ये घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संध्या म्हात्रे यांनी काम पाहिले.
सकाळी नाष्टा न बनविल्याच्या कारणावरून प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या आरोपी स्वप्ना आणि तिची मयत मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली होती. याच भांडणामध्ये रागाच्या भरात स्वप्ना हिने तिची मावशी शोभा हिच्या डोक्यावर आणि डाव्या डोळ्यावर किचनमधील चाकूने वार करून तिचा हत्या केली. तसेच भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून आरोपी स्वप्ना हिने कपडेही वॉशिंग मशीनमध्ये धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चौकशीसाठी आलेल्या राबोडी पोलिसांना मात्र मावशी पलंगावरून पडल्यामुळे मृत झाल्याचे कारण सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षम राम सोमवंशी, पोलिस निरीक्षक सुधाकर हुंबे आणि उपनिरीक्षक हर्षलकुमार गावित यांना या वृद्धेच्या डोक्यावर जखमा आढळल्या. तसेच घरातील भिंतीवरही रक्ताचे डाग आढळले. त्याच वेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. या अहवालातही तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी स्वप्ना कुलकर्णीला अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82251 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top