महिलेला जीवे ठार मारण्याच्‍या धमकीप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेला जीवे ठार मारण्याच्‍या धमकीप्रकरणी गुन्हा
महिलेला जीवे ठार मारण्याच्‍या धमकीप्रकरणी गुन्हा

महिलेला जीवे ठार मारण्याच्‍या धमकीप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

रोहा, ता. १४ (बातमीदार) : जुन्या वादातून एका २९ वर्षीय महिलेवर धारदार ब्लेडने वार केल्याने या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर आरोपींनी महिलेच्या मुलीला व आईला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेतील आरोपी गोट्या गोविंद जाधव व जयश्री गोट्या जाधव यांनी आपापसात संगनमत करून जुन्या भांडणाचा मनात राग धरून मालती चंद्रकांत पवार हिला मारहाण केली. १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्‍याच्या सुमारास जयश्री जाधव हिने त्‍या महिलेला धरून ठेवले, तर तिच्या पतीने सदर महिलेच्या दोन्ही हातावर, मानेवर व छातीवर ब्लेडने वार केले. या मारहाणीत मालती पवार ही गंभीर जखमी झाली आहे; तर तिच्या मुलीला व आईलाही जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी फरारी झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82252 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top