
धार्मिक श्रद्धांबाबत विद्वेष पसरविणाऱ्याविरोधात भिवंडीत गुन्हा
भिवंडी, ता. १४ ( बातमीदार) : विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आरोपामुळे सध्या सर्वत्र धार्मिक वातावरण दूषित होऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मोबाईलवर वादग्रस्त राजकीय व धार्मिक मेसेज टाकणाऱ्या लोकांवरसुद्धा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे, असे असताना भिवंडीत धार्मिक श्रद्धांबाबत व्हॉट्स अॅप ग्रुपवर विद्वेष पसरविणाऱ्याविरोधात भिवंडीतील कुंभारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय व धार्मिक वादग्रस्त मेसेज कोणी टाकू नये, असा इशारा पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिला आहे.
भिवंडीत एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर हमाद निसार अहमद (रा. इस्लामपुरा, भिवंडी) याने मुस्लिम धर्माचे धर्मगुरू अल्लाह हजरत इमाम अहमद रजा खान व त्यांचे वंशज हुजर ताजुशरिया अलामा अख्तर रजा खान अझहरी यांच्याबाबत संदेश प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून वकास अहमद सगीर अ. मलिक यांनी शहर पोलिस ठाण्यात हमाद निसार अहमद यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82253 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..