मुलुंडमध्ये ध्यान शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये ध्यान शिबिराचे आयोजन
मुलुंडमध्ये ध्यान शिबिराचे आयोजन

मुलुंडमध्ये ध्यान शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः अचेतन मनामध्ये अद्‍भुत शक्ती असतात. त्या ध्यान अवस्थेमध्ये जागृत होतात. या मानवी शरीरातील अचेतन मनाच्या प्रचंड चमत्कारिक शक्तींबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. याच अनुषंगाने यावर मार्गदर्शन करण्यासाठी देवज्योती पिरॅमिडतर्फे एका ध्यान शिबिराचे आयोजन रविवारी (ता. १५) संध्याकाळी ५ ते ७ यादरम्यान करण्यात आले आहे. मुलुंड पूर्वेतील द्रुतगती मार्ग येथील गणेश विसर्जन तलावाजवळील पिरॅमिड ध्यान केंद्र येथे होणाऱ्या या शिबिरामध्ये विनोद मल्ल्या यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82256 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top