आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दासभक्‍तांची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दासभक्‍तांची मांदियाळी
आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दासभक्‍तांची मांदियाळी

आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दासभक्‍तांची मांदियाळी

sakal_logo
By

रेवदंडा, ता. १४ (बातमीदार)ः निरूपणाच्या माध्यमातून मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, अशी शिकवण देणारे थोर निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस शनिवारी त्‍यांच्या मारुती आळीतील निवासस्थानी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
सकाळपासून दासभक्‍तांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. दोन वर्षे कोरोनामुळे वाढदिवस साजरा केला नसल्याने यंदा त्‍यांचा निवास परिसर सदगुरूमय झाला होता. चौकाचौकात होडिंग्ज लावण्यात आले होते, त्‍यावर रोषणाई केली होती. रस्त्यावर सुबक रांगोळ्या तर फुलांनी सजावट केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82257 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top