मोदी यांचे छायाचित्र लावलेल्या चुलीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी यांचे छायाचित्र लावलेल्या चुलीचे वाटप
मोदी यांचे छायाचित्र लावलेल्या चुलीचे वाटप

मोदी यांचे छायाचित्र लावलेल्या चुलीचे वाटप

sakal_logo
By

बदलापूर, ता. १४ ः इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढते दर व वाढती महागाई याविरोधात बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावलेल्या चुलींचे वाटप करून अनोखे आंदोलन केले. स्टेशन परिसरात हे आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅसचे दर आता १००० वर गेले असून, पुन्हा आता घरोघरी मातीच्या चुली वापरण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली असल्याचे सांगत गॅस सिलिंडरला हार व फुले वाहून श्रद्धांजली देण्यात आली. ठाणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रियांका दामले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, महिला शहर अध्यक्षा अनिसा खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82259 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top