मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या
मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केली आहे. यासाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतिहास संशोधक शरद गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

संभाजी महाराज हे तब्ब्ल १८ भाषेमध्ये पारंगत होते, संस्कृतपंडित होते. त्यांनी बहुभाषिक, बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख यांसारखे ग्रंथांचे लेखन केले. त्यांच्या ग्रंथातून वैश्विक विचार त्यांनी मांडला आहे. त्यांचे हे विचार तरुणांना कायम प्रेरणा देणारे असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठास देणे आवश्यक असून यासाठी आपण अनेकदा पत्रव्यवहार केला असल्याचेही शरद गोरे यांनी सांगितले.

महापुरुषांच्या यादीत समावेश करा!
छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांच्या एकूणच इतिहासावर नवीन संशोधन करण्यासाठी सरकारने ग्रंथ समिती स्थापन करावी. यामुळे त्यांच्या ग्रंथांचा आणि वैश्विक विचारांचा राज्यात, देशात आणि जगभरात प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा तत्काळ समावेश करावा आणि महाविकास आघाडी सरकारने साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा आदी मागण्याही पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82263 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top