सायवन कासा रस्त्यावर भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायवन कासा रस्त्यावर भीषण अपघात
सायवन कासा रस्त्यावर भीषण अपघात

सायवन कासा रस्त्यावर भीषण अपघात

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : कासा सायवन खानवेल रस्त्यावर शुक्रवारी (ता. १३) रात्री पावणेदोन‍याच्या दरम्यान इको गाडीस भरधाव आर्टिगा गाडीने ठोकर दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. इको चालक रूपेश कवळे (वय २०) हा वाघाडी येथून बापगावकडे जात असताना रात्री धरमपूर हद्दीत सायवनहून कासाकडे जाणाऱ्या भरधाव आर्टिगा गाडीने इको वाहनास समोरासमोर धडक दिली. यात इको गाडी खड्ड्यात पडून झाडाला अडकली. यात इकोचालकाच्या हाता, पायाला गंभीर मार बसला; तर अन्य एक जखमी झाला आहे. जखमींना वापी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. कासा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. सध्‍या लग्नसराई सुरू असून, या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी भरधाव वाहने जात असून वारंवार अपघात घडत असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82267 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top