वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

sakal_logo
By

वसई, ता.१४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या रखडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पार पाडली जात असून प्रशासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार बदल करत प्रभाग रचना जाहीर केली आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकूण ४२ प्रभाग रचना करण्यात आली असून १२६ सभासदांची संख्या निश्चित केली आहे. कोरोना काळापासून निवडणुका कधी होणार, याचे वेध विविध पक्षांतील मंडळींना लागले आहेत. त्यातच अगोदर दोन वेळा प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे निवडणूक रखडली. त्यामुळे पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पालिकेला पाठवली असून प्रशासनाने अंमलबजावणी केली आहे; परंतु निवडणुका पावसाळ्यात की नंतर, अशी चर्चा सध्या वसई-विरारमध्ये रंगू लागली आहे.
प्रभाग रचनेवर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याने महापालिका प्रशासनाने वसई तहसीलदार, महापालिकेचे नऊ प्रभाग, मुख्यालय, प्रांत कार्यालय याठिकाणी नागरिकांसाठी प्रभाग रचनेबाबत माहिती उपलब्ध केली असून महापालिकेच्या अधिकृत संकेतस्‍थळावरही टाकण्यात आली आहे. त्यामुळे आपला प्रभाग पाहता येणार असल्‍याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82276 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top