म्हाडाच्या उमेदवारांची जूनमध्ये कागदपत्रे तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या उमेदवारांची जूनमध्ये कागदपत्रे तपासणी
म्हाडाच्या उमेदवारांची जूनमध्ये कागदपत्रे तपासणी

म्हाडाच्या उमेदवारांची जूनमध्ये कागदपत्रे तपासणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची संवर्गनिहाय सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीपासून उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. १ हजार ६३० उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात येईल. तसेच कमी पदांवर पात्र उमेदवारांची प्रथम नियुक्ती करण्यावर म्हाडा विचार करत आहे.

म्हाडा प्राधिकरणातील विविध संवर्गातील ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी २ लाख ७४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ५८ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते; तर १ लाख ८० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची संवर्गनिहाय सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार जास्त पदसंख्या भरायची आहे तिथे १:२ आणि कमी पदसंख्या भरायची आहे तिथे १:३ या प्रमाणानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १ हजार ६३० उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे. तसेच कमी पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती प्रथम करण्याचा विचार म्हाडा करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82278 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top