
तळागाळात शिवसेना वाढावी
मुंबई, ता. १४ ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांतील राजकारणावर योग्य उत्तर देत विरोधकांची तोंडे बंद करतील, असा विश्वास आम्हाला आहेच. पण त्यासोबतच शिवसेना सर्वांना पुरून उरेल, असा आत्मविश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. संपूर्ण राज्यातून शिवसैनिक बीकेसी मैदानातील सभेला उपस्थित राहिले होते. ग्रामीण भागापासून ते शहरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेसाठी हजर राहिले होते. त्याचवेळी तळागाळातील शिवसेना वाढावी, अशीही प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांची होती.
राणा दाम्पत्याला सभेतून योग्य उत्तर मिळेल, असाही विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. राज्यात भाजपचे फूस लावून राजकारण सुरू आहे. त्यामधूनच अनेक वाचाळवीर नेत्यांना भाजप मोठे करत आहे. त्यामधूनच सुडाच्या राजकारणाला ऊत आल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केली. शेतीला जोडूनच शिवसेना आता स्थानिक पातळीवर संघटना वाढीचे अभियान राबवत असल्याची प्रतिक्रिया पुण्याच्या हवेली शिवापूरचे सरपंच राजू सट्टे यांनी दिली. शिवसेनेने यापुढे ग्रामीण भागातील शिवसेना वाढवण्यासाठी सहकार क्षेत्रातील शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढायला हवे, सहकार क्षेत्रात कक्षा विस्तारायला हव्यात, असे हवेली युवासेना तालुका प्रमुख आदित्य बांडे हवालदार यांनी सांगितले. साखर कारखाने तसेच सहकार क्षेत्रातील चळवळीचे प्रतिनिधित्व वाढताना शिवसेना वाढायला हवी, असेही ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82279 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..