चित्रकला परीक्षांचा निकाल रखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला परीक्षांचा निकाल रखडला
चित्रकला परीक्षांचा निकाल रखडला

चित्रकला परीक्षांचा निकाल रखडला

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : राज्य कला संचालनालयामार्फत ९ ते ११ एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचा निकाल रखडला आहे. या परीक्षेला राज्यात जे विद्यार्थी ऐनवेळी बसले होते, त्यांची नोंदणी आणि इतर माहिती गोळा करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्याने हा निकाल रखडला असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने त्या बंद असल्याने एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचा निकाल २० मेदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य कला संचालनालयाकडून हा निकाल जाहीर करण्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. त्यातच शाळांकडून निकालपत्रही गोळा करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठीची डेटा इंट्रीची कामेही पूर्ण झाली असून तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती संचालनालयाने दिली. राज्यात यंदा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे एटीडी‍ या अभ्यासक्रमांच्या फाऊंडेशन कोर्ससाठी आवश्यक असलेले विद्यार्थीही परीक्षेला बसले होते. दरम्यान, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्यास शाळांना १५ मेपर्यंत शिक्षण मंडळाने मुदत दिली होती; मात्र चित्रकला परीक्षेचा निकालच रखडला असल्याने मंडळाकडून २ जूनपर्यंत हे प्रस्ताव स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82280 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top