विरार येथील घरे विजेत्यांकडून परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार येथील घरे विजेत्यांकडून परत
विरार येथील घरे विजेत्यांकडून परत

विरार येथील घरे विजेत्यांकडून परत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये काढलेल्या सोडतीतील विरार बोळिंज येथील सुमारे २०० हून अधिक विजेत्यांनी विविध कारणे देत घरे परत केली आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील शिरढोण, खोणी येथील घरांकडेही विजेते पाठ फिरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हाडा योजना आणि पंतप्रधान आवास योजनेतील यशस्वी अर्जदारांना ३१ मेपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली.

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये ८ हजार ९८४ घरांची सोडत काढली होती. या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यास मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, एसटी कामगारांचा संप अधिक चिघळल्याने ग्रामीण भागातील विजेत्यांपर्यंत प्रथम सूचना पत्र मुदतीमध्ये पोहोचू शकले नाही. त्यामुळे विजेत्यांची मागणी विचारात घेऊन मंडळाने पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा योजनेतील विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यास १५ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली होती. यानंतरही म्हाडा आणि पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यास ३१ मे अखेरची मुदत दिली आहे. दरम्यान या सोडतीमधील विरार बोळिंज येथील योजना क्रमांक २७४ अ, २७८ अ मधील विजेते घरे परत करू लागले आहेत. या दोन्ही योजनेतील सुमारे २०० हून अधिक विजेत्यांनी घरे परत केली असल्याचे सूत्रांनी सांगितले; तर पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांकडूनही घरे परत करण्यात येऊ लागल्याने मंडळाला प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना आता पत्र पाठवावे लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82284 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top